🕒 1 min read
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Suspension on scheduled international commercial passenger services to and from India extended till 31st December: Directorate General of Civil Aviation (DGCA) pic.twitter.com/SPT68cxkRX
— ANI (@ANI) November 26, 2020
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.
आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी संविधान बदलणार आहेत असा खोडसाळ आरोप कोणी करू नये : आठवले
- अर्णबचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारला झापलं!
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- ‘धनगर आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

