मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची पक्ष शिस्त मोडल्याप्रकरणी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.
अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या मविआच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढवत आहे.
चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने कोणताही पाठिंबा दिलेला नाही. पक्षाची शिस्त भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदी संविधान बदलणार आहेत असा खोडसाळ आरोप कोणी करू नये : आठवले
- कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया : मुश्रीफ
- ‘एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून प्रशासन आणि सरकार कायद्याची चौकट मोडू शकत नाही’
- ‘कंगना राणावतला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावी’
- ‘धनगर आरक्षणप्रश्नी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला शून्य गुण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

