Share

ग्रामीण भागातील महिलांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून लघुउद्योग सुरू करावे -चंद्रकांत खैरे

Published On: 

औरंगाबाद : ग्रामीण भागात आजही काही महिला शेती व्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय व पशुपालन करतात. मात्र या परंपरागत व्यवसायाबरोबरच आता महिलांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून लघुउद्योजक सुरू करावा. आर्थिक प्रगती करून सधन व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लघुउद्योजक महिलांसाठी मोफत पैठणी प्रशिक्षण व स्वंयरोजगार कार्यशाळेचे आयोजन कन्नड येथे केले होते.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शहरातील रस्ते भूमिपूजन, अत्याधुनिक शिवभोजन वाहनाचे लोकार्पण, आरोग्य शिबिर, रक्तदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात होणार्‍या जोरदार पावसामुळे पुराने थैमान घातले आहे. पुरात अनेकांचे संसार बुडाले आहेत.

यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदतीची हाक दिलेली आहे. त्यानुसार ‘पुरग्रस्तांना एक हात मदतीचा’ या अभियानाअंतर्गत शिवसेना, युवासेनेद्वारे वेगवेगळ्या स्वरुपात मदतही पाठवण्यात आली. कन्नड येथील कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या मीना कांबळी, विशाखा राऊत, महिला संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनीषा कायंदे, शिवअंगणवाडी सेनेच्या राज्य अध्यक्ष सारिका सावंत, आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह शिवसेना, युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!