बुलडाणा : अतिवृष्टी आणि महापुरात अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. या संकटग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तत्काळ मदत देण्यासाठी चालढकलपणा करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
या संदर्भात भाजपच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘बुडीत साखर कारखाण्यांसाठी तीन हजार कोटी तातडीने देणारे महाभकास आघाडी सरकार, आता अतिवृष्टी आणि महापुरातील आपदाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मात्र चालढकल करीत आहे.’
बुडीत साखर कारखाण्यांसाठी तीन हजार कोटी तातडीने देणारे महाभकास आघाडी सरकार, आता अतिवृष्टी आणि महापुरातील आपदाग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मात्र चालढकल करीत आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) July 30, 2021
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात पूराचे पाणी शिरले आहे. त्यात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री या भागाचा दौरा करत असले तरी अद्याप शासनाच्या वतीने ठोस आर्थिक मदत या नागरिकांना मिळालेली नाही. या पूरग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना भेटले- प्रविण दरेकर यांचा आरोप
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- ‘भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही’; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंच स्पष्टीकरण
- संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच, लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’


