Share

महाराष्ट्रात महिला खरंच सुरक्षित आहेत का ? लातूर जिल्ह्यातील घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला

Published On: 

अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील कोपरा (जि.लातूर) येथील २६ वर्षीय तरुणीवर गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने अत्यंत अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून अद्याप १६ पैकी केवळ दोन आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. या संतापजनक प्रकरणातील उर्वरित सर्व आरोपींना तत्काळ अटक करून भर चौकात शिक्षा द्यावी अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली.

त्यांनी मंगळवारी (दि.१६) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पिडीतेची आणि कुटुंबियांची भेट घेतली.कोपरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शुक्रवारी (दि.१२) दुपारी २६ वर्षीय पिडीतेच्या घरासमोर काही गावगुंडांनी जेसीबी लावून जमीन उकरण्यास सुरुवात केली. गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच ग्रामसेवकाच्या मदतीने पीडितेच्या घरासमोरील देवीच्या मूर्तीची विटंबना करीत तोडफोड केली. यावेळी घरात एकट्या असणाऱ्या पिडीतेने धैर्याने त्या सर्वांना विरोध करत व्हिडीओ शुटींग सुरु केली. याच्या रागातून त्या सर्वांनी पिडीतेचा मोबाईल हिसकावून घेत तिला बेदम मारहाण सुरु केली आणि जेसीबी खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला.

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिचा विनयभंग करीत गुप्तांगावर दगड मारून आणि कटर सारख्या वस्तूने हातावर वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या सर्व अत्याचारात काही महिलांनी त्या गुंडांना साथ दिली. जखमी पिडीतेवर किनगाव शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून १६ जणांवर किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (दि.१६) भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, आ. रमेश कराड यांनी स्वाराती रुग्णालयात पिडीतेची भेट घेतली. यावेळी खापरे म्हणाल्या कि, सध्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. घटनेच्या चार दिवसानंतरही फक्त दोघांना अटक करणारे पोलीस आरोपींना पाठीशी घालण्यात धन्यता मानत आहेत.

अत्याचाराची फिर्याद घेऊन पीडिता ठाण्यात गेली असता तिला अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले. तक्रारीची तातडीने दखल घेऊन कारवाई झाली असती तर सर्व १६ आरोपी पोलिसांच्या हाती लागले असते. पोलीस यंत्रणा कुचकामी झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचार भाजप महिला आघाडी कदापीही सहन करणार नसून या लाजिरवाण्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी खापरे यांनी केली.

यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी,उपाध्यक्षा स्वाती जाधव ,प्रदेश सचिव अँड.वर्षा डहाळे,ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजप चे प्रवक्ते रामभाऊ कुळकर्णी भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!