🕒 1 min read
औरंगाबाद : जागतिक महिला दिनी पैठण-औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात एका महिलाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास धनगावजवळ हा अपघात झाला. खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रेखा यंशवत पाटील असे ४२ वर्षीय मृत महिलेचे नाव असून ती पैठण येथील पन्नालालनगर येथील रहिवासी आहे,.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रेखा पाटील या पतीसोबत औंरगाबाद येथून पैठणकडे जात असताना धनगाव फाट्याजवळ खड्ड्यांमध्ये दुचाकी आदळली आणि त्या रस्त्यावर पडल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. याबाबात माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेखा यांना तपासून मृत घोषित केले.
पैठण-औंरगाबाद रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत, यामुळे या रस्त्यावर नेहमी छोटेमोठे अपघात होता. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून हे खड्डे कधी बुजवणार आणि रस्त्याचे चौपदरीकरण केव्हा होणार असा सवाल नागरिकांडून उपस्थित करण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या
- मराठवाडा वॉटरग्रीड बंदकरण्याचे पाप करणार नाही : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
- मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाबाबत विधान परिषदेत आमदार आक्रमक, एकत्रीत बैठक घेण्याची सभापतींची सूचना
- लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; भीषण अपघातात एक ठार, सहा जखमी
- वडापाव खाऊ घालण्याचे आमिष दाखवून सात वर्षीय बालिकेवर अत्याचार; २० वर्षे सक्तमजुरी
- औरंगाबादेत कोरोनाचे ३८८ रुग्ण, पाच जणांचा मृत्यू; ५५० जणांना दिला डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
