मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीला लागले आहे. यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना हा आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्यापुर्वीच काही संघाना काही धक्के बसले आहेत. त्यात दिल्ली कॅपीटलचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्याला मुकणार आहे.
मात्र, यादरम्यान श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरु होत्या. मंगळवारी आखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. दिल्ली कॅपीटलने त्याच्या नव्या कर्णधारपदी भारताचा धडाकेबाज युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे.
श्रेयस जखमी असल्यामुळे तो दिल्ली टीमसाठी खेळणार नाही, पण मग त्याला त्याचा पगार दिला जाईल का? असे प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागले होते. आता त्याची सत्यता समोर आली आहे. आयपीएलमधून श्रेयस अय्यरच्या बाहेर पडल्यानंतरही ‘दिल्ली कॅपीटल्स’ त्याला पूर्ण पगार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. श्रेयसला दिल्लीकडून प्रत्येक सीझन 7 कोटी रुपये मिळतात. यावेळीही त्याला ती रक्कम मिळणार आहे. त्याला ‘स्पोर्ट्समॅन विमा योजने’अंतर्गत संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

