Share

‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा

Published On: 

कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने मात्र निवडणूक व्हावी अशी मागणी उचलून धरली होती. यांनतर, काही दिवसांपूर्वी गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

यामुळे इच्छूकांनी संचालकपद मिळवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. आज (१ एप्रिल) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, आता या निवडणुकांमधील उत्सुकता आणखीच वाढली आहे. कारण या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे तिसरी आघाडी करणार आहेत. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना एकत्रित घेऊन तिसरी आघाडी तयार करणार असल्याचं आवाडे यांनी जाहीर केलं आहे. यामुळे निवडणुकांमध्ये अधिकच चुरस वाढल्याचं दिसून येतंय.

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू विकास आघाडीची घोषणा केली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाविरुद्ध शाहू विकास आघाडीची थेट लढत स्पष्ट होती. तर, काँग्रेसचे आमदार पी एन पाटील हे महाडिक गटासोबतच आहेत. याच गटाची सध्या गोकुळ मध्ये सत्ता आहे. मात्र, आता आमदार प्रकाश आवाडे यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केल्यामुळे वारं फिरल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!