मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यामधील तिसरा वन डे सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. कोहलीने व्यस्त वेळापत्रकावर माध्यमांशी बोलताना टीका केली होती. इंगलंड विरुद्धची एकदिवशीय मालिका खेळवली नसती तर संघाला पुरेशी विश्रांती मिळली असती असे देखील कोहली म्हणाला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो बबलमध्ये (जैव सुरक्षित वातावरण) राहून आंतरराष्ट्रीय मालिका खेळणे सोपे नसते असेही त्याने बोलून दाखवले आहे.
त्यावर बीसीसीआयने गांभीर्याने दखल घेतली. यापुढे प्रत्येक मालिकांमध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी बीसीसीआय दबाव टाकू शकणार नाहीत. शिवाय अति क्रिकेट खेळून शारीरिक व मानसिकरीत्या खेळाडू थकले असतील तर त्यांना मालिकेमधून माघार घेण्याची मुभाही देण्यात येईल असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. बीसीसीआय खेळाडूंना सर्व सामने खेळण्याची जबरदस्ती करत नाही. तसेच कोहलीला जर विश्रांती हवी होती तर त्याने तसेच सांगायला हवे होते. बीसीसीआयने त्याला ही परवानगी दिली असती.
भारतीय संघातील खेळाडूंवर सगळेच सामने खेळले पाहिजेत, अशी जबरदस्ती केली जात नाही. सध्या संघाचा सेकंड बेंच भक्कम आहे, त्यामुळे संघाकडे खूप पर्याय आहेत. अशा स्थितीत ज्या खेळाडूंना विश्रांती हवी असेल त्यांनी बीसीसीआयशी संवाद साधला पाहिजे असे थेट माध्यमांशी बोलू नये, असेही बीसीसीआयने कोहलीला सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘मानसिक तयारी ठेवा…मंदिरे बंद, दुकाने बंद, मॉल बंद…फक्त पब आणि बार सुरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

