Share

उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

सातारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना आता महाविकास आघाडी सरकारने चांगलाच दणका दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे.

सातारा-कोल्हापूर महामार्गावरील साताऱ्यातील आनेवाडी व पुण्यातील खेड शिवापूर या टोलनाक्यांचा ठेका अशोका स्थापत्य या कंपनीकडून काढुन तो शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राजकीयय धक्का महाविकास आघाडीने दिल्याचे बोलले जात आहे.

अशोक स्थापत्य ही कंपनी साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक अशोक सावंत यांची आहे. येत्या तीन एप्रिलला हे व्यवस्थापन बदलले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुणे- बंगळूर महामार्गावरील सातारा ते पुणे मार्गावरील दोन टोलनाक्यांचे व्यवस्थापन येत्या तीन एप्रिलपासून बदलले जाणार असल्याची माहिती आता मिळत आहे.

गेल्या दोन, तीन दिवसांपासून टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. आता अशोक स्थापत्य या कंपनीकडून या दोन्ही टोलनाक्यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्यात आहे.

येत्या तीन एप्रिलला नवीन व्यवस्थापन येणार आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना राजकिय धक्का दिल्याचे सध्याच्या घडीला तरी दिसत आहे. या सर्व प्रकरणावर अद्याप तरी खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. परंतु या प्रकरणावर ते आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!