बीड : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत परळी शहरातून मदतफेरी काढली. या मदतफेरीत शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पूरग्रस्तांसाठी लाखो रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर आता तब्बल २२० क्विंटल अन्नधान्य पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. याबाबत पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता परळी शहरातील चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मदत फेरीला सुरवात केली. शहरातील बस स्थानक रोड, एक मिनार चौक, स्टेशन रोड, टॉवर गणेशपार आदी प्रमुख मार्गावरून ही मदतफेरी काढली. फेरीत पंकजा मुंडेंनी शहरातील व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन करत संवाद साधला. या वेळी पंकजांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आर्थिक मदतीबरोबरच धान्यासह साहित्याची मदत केली.
अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी परळी येथून भाजपतर्फे गव्हाचे पीठ, तांदूळ, तूर दाळीसह २२० क्विंटल अन्नधान्याचे पॅकेटस पाठवण्यात आले. pic.twitter.com/KPJS2Q2eH3
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 31, 2021
‘आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. म्हणून मदत फेरी काढली. मी सध्या तरी नुकसानग्रस्त भागात जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनामुळे विधवा, अनाथ झालेल्यांना भरीव मदत द्या’, खा.नवनीत राणा यांची लोकसभेत मागणी
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- ‘रात्रीच्या वेळचा बंद केलेला सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा’, आ.श्वेता महाले यांची मागणी
- ‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत


