Share

‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. काल शुक्रवारी त्या बंगालला रवाना झाल्या. या पाच दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. पुढच्यावेळी पवारांना भेटेन असे त्यांनी जाताने माध्यमांना सांगितले.

या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे. याबाबत एका दैनिकाची बातमी शेअर करत त्यांनी मोदी विरोधकांना चिमटा काढला आहे.

थकल्या-भागल्या पक्षांच्या तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी मैदानात उतरलेले शरद पवार हे ममता बॅनर्जी यांना दिल्लीत भेटलेच नाहीत. अर्धजीवंत पक्षांचे नेतृत्वही हातून जाते की, काय या चिंतेपोटी पवार यांनी दिल्ली सोडली. पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत असा टोला त्यांनी लगावला.

ममता बॅनर्जी यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी महाआघाडीची गरज व्यक्त केली होती. बंगालहून दिल्लीला येण्यापूर्वी त्यांनी विरोधकांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीत विरोधी नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केल्याचे समजतेय. पण त्यांनी शरद पवारांना भेटणे टाळल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!