Share

‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं काल रात्री सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९४ वर्षाचे होते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी ५४ वर्षं सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं होते.

आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी आणि जन-सामान्यां प्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपणाऱ्या देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या पेनूर या जन्मगावी ठेवण्यात आलं. यावेळी देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ आणि समर्थकांनी गर्दी केली. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. ‘महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ आमदार राहिलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. गणपतराव देशमुख यांनी राजकारणात समाजकारण केले. त्यांनी वंचित शेतकरी व कामगार वर्गासाठी आवाज उठवला. त्यांच्या या कृतीने देशात एक अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे’ असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नरसय्या आडम यांनी व अनेक नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!