बुलडाणा : चिखली विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा होत होता. तो अचानकपणे बंद करण्यात आल्याने सदर वीज पुरवठा तातडीने पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी बुलडाणा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, चिखली तालुक्यातील मौजे धोत्रा भनगोजी, शेलसुर, आंधई, शेलोडी, किन्होळा, सवणा, वाडी ब्रम्हपुरी, डोंगरशेवली, करवंड या व इतर गावातील तसेच बुलडाणा तालुक्यातील धाड, रायपूर व मासरूळ सर्कल मधील २५ टक्के शेतकरी जंगली प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे संरक्षणासाठी शेतामध्ये राहतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शेतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.
तसेच जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुट पालन, शेळी पालन, इमू पालन, तसेच दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींचे पालन करीत आहेत. या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना विद्युत उपकरणाद्वारे दुध काढण्यासाठी विजेची गरज असते. तसेच वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने आणि रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीज पुरवठा बंद केल्याने पाळीव जनावरांसहित वन्य प्राण्यांमुळे मनुष्य जीवितहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या अगोदर चिखली तालुक्यामध्ये अस्वलांच्या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झालेले आहे. रात्रीच्या वेळचा बंद केलेला सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा अशी मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजकारणातून समाजसेवा करणारा नेता हरवला’, प्रियांका गांधींकडून श्रध्दांजली
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
- ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकाचाही मृत्यू नाही’, खा.संजय राऊत यांचा दावा
- भगत सिंह नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना मुलाला लागला गळफास
- गणपतराव आबांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, समर्थकांना अश्रू अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
