Share

मातोश्रीच्या आशिवार्दाने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भगवा फडकला : अब्दुल सत्तार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मातोश्री च्या आशिर्वादाने आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रथमच भगवा फडकवला असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दिले. ते अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती या वेळी दिली. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या सर्व समावेशक प्रश्नांना उत्तरे देखील दिली.

अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे तसेच सर्व काँग्रेसचे जुने मित्र माजी आमदार कल्याण काळे, सुभाष झांबड, राष्ट्रवादीचे आमदार सतिष चव्हाणसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहकारी मित्रांनी मनापासून मला शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी मदत केली. त्यामुळे आज मी जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून प्रथमच ही बँक पुर्णपणे शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच सहकारी क्षेत्रामध्ये सर्वोत्तम यश संपादन केले आहे. आता ही बँक राज्यातील क्रमांक एकवरील बँक करणार असल्याचा सुतोवाच देखील केला.

या यशाचे श्रेय आपले पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने ही निवडणुक पार पडली आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये नेतृत्व सिद्ध करम्याची संधी देखील शिवसेनेच्या संचालक, अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांना मिळाली आहे. हे सर्व आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे सर्व कामे नक्कीच करणार आहेत. तसेच ही बँक शेतकऱ्यांचे मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये सर्वांनी आपापले जोडे बाहेर काढून मगच अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदाचा साजेल असेच काम करतील यात मात्र शंकाच नसल्याचेही सत्तार यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!