Share

भालचंद्र शिरसाट यांना दिलासा देत मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने दिला जोरदार दणका

Published On: 

मुंबई – मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टाने दणका दिला आहे. भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना दिलासा देत त्यांचं स्थायी समिती सदस्यपद रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व रद्द करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी निर्णय दिला होता. त्याच अनुषंगाने महापालिकेतील महाविकास आघाडीने बहुमतावर केलेल्या ठरावाच्या विरोधात भालचंद्र शिरसाट यांनी केलेल्या याचिकेवर अंतिम निर्णय देताना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने महापालिकेचा ठराव रद्द करीत भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय सोमवारी दिला.

भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबत बोलताना असे प्रतिपादन केले की, न्यायालयाने भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समिती सदस्यत्व कायम ठेवण्याचा दिलेला निर्णय म्हणजे शिवसेनेच्या मनमानी, द्वेषपूर्ण कारभाराला चपराक असून लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणारा आहे. भालचंद्र शिरसाट यांच्या याचिकेवर काॅऊंन्सिलर अॅड. अमोघ सिंग आणि अॅड. जीत गांधी यांनी न्यायालयात बाजू समर्थपणे मांडली.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!