Share

विजयी खेळी करणाऱ्या पोलार्डने ठोकले २०२१ आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात विजयी खेळी करताना पोलार्डने आयपीएल २०२१ मधील सर्वाधिक वेगवान अर्धशतकाची नोंद केली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपीटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा आहे. त्याने केकेआर विरुद्ध १८ चेंडुत अर्धशतक झळकावले होते. तर तिसऱ्या स्थानावर चेन्नईचा अंबाती रायडू हा आहे. रायडूने याच सामन्याच्या पहिल्या डावात २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर राजस्थान विरुद्ध पंजाब किंग्सचा खेळाडू दिपक हुडाने देखील २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. केकेआरचा खेळाडू अष्टपैलू आंद्रे रसेल याने चेन्नई विरुद्ध २१ चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.

चांगल्या सुरवातीनंतर मुंबईचा डाव गडगडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर कायरान पोलार्ड फलंदाजीला आला. सुरुवातीपासुनच आक्रमक पवित्रा घेत पोलार्डने चौकार आणि षटकाराची बरसात केली. आणि चेन्नईने दिलेल्या अशक्यप्राय २१९ धावांचे लक्ष्य पार केले. पोलार्डने केवळ ३४ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची अफलातून खेळी केली.

आयपीएल २०२१ मधील वेगवान अर्धशतके

कायरन पोलार्ड- १७ चेंडू वि. चेन्नई सुपर किंग्स
पृथ्वी शॉ – १८ चेंडू वि. कोलकाता नाईट रायडर्स
अंबाती रायुडू – २० चेंडू वि. मुंबई इंडियन्स
दिपक हुडा – २० चेंडू वि. राजस्थान रॉयल्स
आंद्रे रसेल – २१ चेंडू वि. चेन्नई सुपर किंग्स

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!