पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. पंढरपुरात आता निकालाचे चित्र हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. भाजपने मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव निश्चित झाला आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीने भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असून भाजपने त्यांच्याविरोधात समाधान आवताडे यांना उभं केलं आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह एकूण 19 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरी लढत ही भालके आणि आवताडेंमध्येच होताना दिसत आहे.
भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांनी मात्र मोठी आघाडी मिळवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी भालकेंच्या प्रचारासाठी जोर लावला होता.
महाराष्ट्र मध्ये पंढरपूरची सीट राखता राखता महाविकास आघाडीचे कपाळात आलेत आणि वार्ता छातीठोकपणे बंगालची करतायेत. अरे बंगालमध्ये बीजेपी हरली तरी ३ वरून १०० जवळ चालले तुम्ही साले ३ पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीत बीजेपी ने तुमचा घाम काढला.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
समाधान आवताडे यांच्या मोठ्या आघाडीनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. ‘महाराष्ट्र मध्ये पंढरपूरची सीट राखता राखता महाविकास आघाडीचे कपाळात आलेत आणि वार्ता छातीठोकपणे बंगालची करतायेत. अरे बंगालमध्ये बीजेपी हरली तरी ३ वरून १०० जवळ चालले तुम्ही साले ३ पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीत बीजेपी ने तुमचा घाम काढला.’ असं टीकास्त्र निलेश राणेंनी सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुरोगामी महाराष्ट्र हादरला! पतीला घटस्फोट देणाऱ्या महिलेला जातपंचायतीकडून थुंकी चाटण्याची शिक्षा
- मानलं तात्या! विजयानंतर मुंबईच्या चाहत्यांकडुन पोलार्डवर कौतुकाचा वर्षाव
- मैदानावरील यशानंतर किरॉन पोलार्डचं ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर ‘असं’ झालं स्वागत : पहा व्हिडीओ
- बंगालच्या रणसंग्रामात माजी क्रिकेटपटूंचा सामना; दिंडा पिछाडीवर तर तिवारी आघाडीवर
- ‘आता भाजपच्या प्रमुख विरोधक म्हणून ममता बॅनर्जी उदयाला आल्या आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

