मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पंजाबचा गोलंदाज हरप्रीत ब्रारने या सामन्यात आरसीबीचे महत्वाचे फलंदाज विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सला बाद केले. एकाच आयपीएल सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स या दोन्ही फलंदाजांना बाद करणारा हरप्रित केवळ सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. हरप्रितपुर्वी हा कारनामा श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, कृणाल पंड्या, नितीश राणा, राशिद खान आणि सुनील नरिन यांनी केला आहे. श्रेयस गोपाळने तर ही कामगिरी तब्बल तीन वेळा केली आहे. या यादीत आता हरप्रीत ब्रारने देखील स्थान मिळवले आहे.
यानंतर सोशल मीडियावर हरप्रीत ब्रारची बरीच चर्चा रंगली होती. नेटकऱ्यांनी त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. मात्र, एका नेटकाऱ्याने पंजाबच्या हरप्रीत ब्रारची बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय सोबत तुलना केली. मात्र, हरप्रीतला अक्षय कुमार सोबत केलेली तुलना आवडलेली नाही. त्याने त्या नेटकाऱ्याला चांगलचं प्रतिउत्तर दिलं आहे.
https://twitter.com/thisisbrar/status/1386251865227100166?s=20
हरप्रितला एक नेटकाऱ्याने तू सिंग इज ब्लिंग मधला अक्षय कुमार दिसतो असं म्हटलं. मात्र या कमेंचा फोटो ट्विट करत त्यावर हरप्रितनं पैशांसाठी पगडी परिधान करत नाही, अशी पोस्ट केली. विशेष म्हणजे यासोबत हरप्रितनं #isupportfarmers असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुरोगामी महाराष्ट्र हादरला! पतीला घटस्फोट देणाऱ्या महिलेला जातपंचायतीकडून थुंकी चाटण्याची शिक्षा
- मानलं तात्या! विजयानंतर मुंबईच्या चाहत्यांकडुन पोलार्डवर कौतुकाचा वर्षाव
- मैदानावरील यशानंतर किरॉन पोलार्डचं ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर ‘असं’ झालं स्वागत : पहा व्हिडीओ
- बंगालच्या रणसंग्रामात माजी क्रिकेटपटूंचा सामना; दिंडा पिछाडीवर तर तिवारी आघाडीवर
- फाफ डू प्लेसिसची ‘ती’ चूक चेन्नईला पडली सर्वात महागात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

