Share

‘ममताजी, तुमच्या जबरदस्त विजयासाठी अभिनंदन’, शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे ममतांसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप १०० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. दरम्यान, ममतांच्या या यशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममतांचे अभिनंदन केले आहे. ‘तुमच्या जबरदस्त विजयासाठी अभिनंदन. आपण लोकांच्या कल्याणासाठी आणि कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी आपले कार्य सुरू ठेवूयात’ असे शरद पवार म्हणालेत.

दरम्यान, या निवडणूक निकालाचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. ‘चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प.बंगाल मध्ये आले,मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरून 84 वर जागा आल्या हे राज्यातील भाजपा नेत्यांना बोलायला जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.’ असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!