Share

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धवल कुलकर्णीने नोंदवीला ‘हा’ खास विक्रम

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीला अंतिम ११ मध्ये स्थान दिले. अंतिम ११ मध्ये सामील होताच धवलने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या इतिहासात किमान एकतरी सामना खेळणारा धवल कुलकर्णी हा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. हा कारनामा इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाला करता आलेला नाही.

महत्वाची बाब म्हणजे २००८ साली धवलने मुंबई संघाकडूनच आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. आणि त्यावेळीही विरोधी संघ हा चेन्नई सुपर किंग्स हाच होता. यानंतर धवल कुलकर्णी हा राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स संघाकडूनही काही आयपीएल सामने खेळला होता. शनिवारी झालेल्या सामन्यात धवलने ४ षटके गोलंदाजी करत ४८ धावा दिल्या मात्र एकही बळी मिळवू शकला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!