Share

‘दीदी ओ दीदी’ या अपमानजनक टिपण्णीला जनतेने ‘दीदी जिओ दीदी’ म्हणत जोरदार उत्तर दिले !

Published On: 

कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.

सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०२ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपचे शुभेन्दु अधिकारी सकाळपासून आघाडीवर होते. मात्र, आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव फारच आनंदी दिसत आहेत. यावरुन त्यांनी भाजपवर निशाणा साधत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. अखिलेश यादव यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करणारी जागरुक जनता, लढाऊ ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या समर्पित नेते आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन. भाजपने एका महिलेवर केलेल्या ‘दीदी ओ दीदी’ या अपमानजनक टिप्पणीला जनतेने दिलेलं हे सडेतोड उत्तर आहे.’

मध्य प्रदेश, बिहार या राज्यांवर कब्जा करणाऱ्या भाजपचा विजयरथ ममता बॅनर्जी यांनी रोखला असे, वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी केले. भाजपच्या प्रमुख विरोधक म्हणून ममता बॅनर्जी उदयाला आल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आवाज उठवला, असे पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!