Share

लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा 

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद आजही उमटत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याची मागणी आजही लावून धरली आहे. या घडामोडींवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भाष्य करत भाजपला लक्ष्य केले आहे.

देशामध्ये यापूर्वी धर्म आणि जातीच्या नावावर दंगली झाल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांविरुद्ध दंगली घडविण्याचा कट केंद्र शासन जाणीवपूर्वक घडवत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येनंतर हि बाब स्पष्ट झाली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अराजकतेचा वचपा काढावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आईच. लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी  सांगितले आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीमध्ये काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढवली असा आरोप होत आहे. या दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृ्त्यू झाला. त्यानंतर लखीमपूर खीरीमध्ये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली. या हिंसाचारामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकरी आणि चार राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!