Share

उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी

Published On: 

नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लखीमपुर घटनेबाबत आक्रमक भूमिका घेतली. तसेच अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेत चरणजीत सिंह यांनी उत्तर प्रदेशात शेतकरी कायद्यावरुन झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला.

‘मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. तसंच ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी थांबवण्यासाठी पंजाबला जोडून असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचीही मागणी केली आहे’, अशी माहिती चरणजीत सिंग चन्नी यांनी दिली आहे.

तसेच उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या कदापि सहन केल्या जाणार नाहीत असंही त्यांनी म्हटले आहे. आपल्या नेत्यांना अटक करण्याची ही पद्धत बंद झाली आहे. कर्तारपूर कॉरिडोअर लवकरात ललकर सुरु करावं अशी विनंती केली आहे. आता यावर सरकारच त्वरित निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान चरणजीत सिंग चन्नी यांना उत्तर प्रदेशचा दौरा करण्याची परवानगी नाकारण्यात आल्यानंतर अमित शाह यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!