Share

राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक

Published On: 

उत्तर प्रदेश: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनाही योगी सरकारने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे लखीमपूर खिरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही कारवाई बेकायदा असून, ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस देण्यात आलेली नाही, असे प्रियंका यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उतत्र प्रदेश सरकारने त्यांना प्रवेश परवानगी नाकारली आहे. तर या भेटीची परवानगी देण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने जमावबंदीचे १४४ कलम लागू केलं आहे. त्यामुळे याठिकाणी राजकीय नेत्यांना परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र काँग्रेस तसेच विरोधी पक्षाने आता याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!