🕒 1 min read
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या संघांमधील द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच हात जोडून आयसीसीच्या दारात उभा आहे. कधी जबरदस्तीने, कधी भीक मागून किंवा आयसीसीला धमकी देऊन भारतासोबत मालिका खेळण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता पाकिस्तानचे माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक यांनी एक असे विधान केले आहे की, जे ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येईल.
क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी -20) भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानपेक्षा पुढे आहे. आजपर्यंत, पाकिस्तान संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून पहिले आयसीसी टी -20 विश्वचषक जिंकले. भारतीय संघ पहिल्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीतही पोहोचला. पाकिस्तान प्रत्येक बाबतीत टीम इंडियाच्या मागे आहे, तरीही पाकिस्तानचे माजी अष्टपैलू अशी विधाने देत आहेत, जे ऐकून प्रत्येकजण फक्त हसतो आणि हसतो आहे.
पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी एआरवाय न्यूजवर रज्जाक म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये अशी प्रतिभा आहे ज्याची तुलना होऊ शकत नाही, संघाकडे अशी क्षमता आहे जी कोणत्याही दबाव सामन्यात मैदानावर ताकद दाखवू शकते. अशी क्षमता भारतीय संघाची अजिबात नाही.’
ते पुढे म्हणले, ‘मला असे वाटत नाही की भारतीय संघ पाकिस्तान संघाशी स्पर्धा करू शकतो. पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारची प्रतिभा आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत हे क्रिकेटसाठी योग्य आहे असे मला वाटत नाही. पाकिस्तानने नेहमीच भारतापेक्षा चांगले खेळाडू जगाला दिले आहेत. ते म्हणाले की, भारतीय संघाला या सर्व कारणांमुळे पाकिस्तानसोबत मालिका खेळायची इच्छा नाही.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- उत्तर प्रदेशात झालेल्या निर्घृण हत्या सहन केल्या जाणार नाहीत- मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी
- ‘स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’त शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या, याला ‘रक्त महोत्सव’ म्हणायचं का?’
- …म्हणून बारामतीला यायला प्रत्येकाला आवडतं; सुप्रिया सुळेंचा सोमय्यांना टोला
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
