Share

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना गेल्याचा समज, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना अटकावासाठी शासनाकडून सांगण्यात आलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र तरीही नागरिक या नियमांचे पालन न करत बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्या अनुषगाने आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात लॉकडाऊन होणार की नाही याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल कोरोनाबाधित रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल असे सांगितले होते.

या मुद्द्यावर आरोग्यमंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. लॉकडाऊन टाळायचे असेल तर कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन नागरिकांना काटेकोरपणे करा असे नेहमीच सांगण्यात येत असून आता शास्नानाकडून काय निर्णय येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनाबाधितांची वाढ न थांबल्यास राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोरोनासंदर्भातील नियम पाळावेच लागतील. कोरोना बाधितांची संख्या मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!