Share

रुपालीताईंनी पूजा चव्हाण प्रकरणात पुण्यात राहुनही चकार शब्दही का काढला नाही ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पाठविलेल्या पत्रानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.संजय राठोड प्रकरण,धनंजय मुंडे प्रकरण,महेबूब शेख प्रकरण राज्यात गाजत असताना सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती.

या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत असून अनेक बैठकांचं सत्र सुरू आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.दरम्यान, काल लोकसभेत देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली.

यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली. नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे असा टोला त्यांनी लगावला.सोबतच त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली.

आता या वादात भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी उडी घेत सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ आणि नवनीत राणा यांच्यावर टीका करण्याआधी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावे आणि माझ्या प्रश्नांची तातडीने उत्तरे द्यावीत असे आव्हान तृप्ती देसाई यांनी दिले आहे.

तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांना विचारले हे प्रश्न

पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून पुण्यात कधी आंदोलन करणार आहात? पंधरा दिवस हे प्रकरण राज्यभर गाजत असताना पुण्यात राहुनही चकार शब्दही तुम्ही काढला नाही ,या बाबतीत स्पष्टीकरण कधी देणार आहात?

करुणा शर्मा -मुंडे यांनी मुंबई पोलिसांना जी तक्रार दिली आहे त्याबाबतीत काय ऍक्शन घेणार आहात? धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या दोन आपत्यांचा उल्लेखच केला नाही म्हणून त्यांची राष्ट्रवादी पक्षातून आणि मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या बाबतीत कधी आवाज उठवणार आहात?

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर औरंगाबादमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही त्याला अटक केली जात नाही म्हणून त्या पिडीतेसाठी कधी रस्त्यावर येणार आहात?गोरगरिबांचे मिटर विजबिल पूर्ण भरता येत नाही म्हणून मीटर काढून त्यांच्या घरी अंधार केला आहे, त्यामुळे या राज्य सरकारच्या हुकुमशाहीच्या विरोधात गरिबांच्या बाजूने कधी तुमचा पक्ष उभा राहणार आहे?

मी काही राजकीय पक्षाशी संबंधित महिला कार्यकर्ती नाही. नवनीत राणा आणि चित्रा वाघ यांची पूर्णपणे बाजूही मी घेणार नाही, पण राजकीय महिला नेत्या म्हणून काम करीत असताना फक्त राजकारण म्हणून टीका करू नका, खरोखरच अन्यायाविरोधात आवाज उठवायचा असेल तर तो सगळीकडे समान असला पाहिजे, त्यात भेदभाव नको; हे आधी शिका असा सल्ला देखील देसाई यांनी चाकणकर यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!