नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. एवढंच नाहीतर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने एका निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी समितीच्या मार्फत चौकशी करण्याची शक्यता आहे.
यातच आता भाजपाचे नेते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि खासदार सुशील कुमार मोदी यांनी धक्कादायक दावा केला आहे. ‘अराजकासारखी परिस्थिती निर्माण झालेली असून, संपूर्ण सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्यात लागलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली तर ते अशी एखादी गोष्ट बोलून जाऊ नये, ज्यामुळे संपूर्ण सरकारचं अडचणीत येईल, अशी भीती उद्धव ठाकरे यांच्या मनात भीती आहे,’ असं सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एक मोठा प्रहार केला आहे. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांमध्ये झालेल्या हेरफाराबद्दल महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस करणार आहेत. याबबातची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला


