जालना : पॉवरग्रीड कंपनीचे कार्यालय फोडून महागडे कॅमेरे आणि दुर्बीण चोरी झाली होती. यातील दोन आरोपींना पोलिसांनी नऊ तासांमध्ये अटक केली त्यांच्याकडून दोन लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल
एक लाख १९ हजार रुपयांचे कार्यालयीन साहित्य आणि एक लाख रुपयांची रिक्षा असा दोन लाख १९ हजारांचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांनी जप्त केला. रिक्षाचालकाने रिक्षाचा नंबर ओळखू येऊ नये, म्हणून त्यावर चिखल लावला. तर दुसऱ्या बाजूने चिकट पट्टी लावून नंबर झाकून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या टीमने लावलेल्या तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सुरेश गीते , कैलास खाडे, समाधान तेलंग्रे , राजू वाघमारे, सुधीर गायकवाड, सुमित्रा अंभोरे यांचा समावेश होता.
महागडे कॅमेरे, दुर्बीणीची चोरी
पावरग्रीड कंपनी ही वीज क्षेत्रात काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. मेन अतिउच्च दाबाच्या वीज तारा ओढण्याचे या कंपनीचे काम आहे. त्यामुळे मनोऱ्यावर काम करणाऱ्या कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी या कंपनीचे अभियंते खाली बसून दुर्बिणीच्या माध्यमातून मनोऱ्यावर सुरु असलेल्या कामावर नियंत्रण ठेवतात. त्यासाठी महागड्या कंपनीचे आणि गुणवत्तेचे कॅमेरे आणि दुर्बिणी त्यांच्याकडे आहेत. या क्षेत्रात महत्त्वाची असलेली ड्रील मशीन देखील त्यांना आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या दोन मशीन, दोन दुर्बीण, एक कॅमेरा, २ संगणक हे साहित्य ३ रोजी संभाजीनगर कार्यालयातून पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कार्यालयातून चोरीला गेले होते.
नऊ तासांत दोन आरोपी ताब्यात
तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मंजुषा सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माहितीच्या आधारे शेख हबीब शेख युनुस, सय्यद शौकत सय्यद महमूद यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- ‘…आणीबाणी, बोफोर्स तोफ खरेदीत खाल्लेल्या कमिशनमुळे झाली नाही, तशी नाचक्की ना?’
- रेणू शर्मांवर आरोप करणाऱ्या कृष्णा हेगडेंनी भाजपला रामराम ठोकत हाती शिवबंधन बांधलं !
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- स्मार्ट सिटी सीईओ पद पांडेय यांच्याकडेच राहावे हीच खैरेंची इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

