Share

रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळणार ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला कायद्याने मिळावेत, अशी मागणी राज्य शासनाने केंद्राकडे करावी अशी सूचना भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी. विधानसभेत केली ती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मान्य केली.

राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाई बाबत तारांकित प्रश्न आज विधानसभे चर्चेला आला असताना आमदार आशिष शेलार यांनी एका महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. रांजणगाव येथे एका बंद कारखान्यात 132 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार होऊन त्यातील 112 किलो ड्रग्जची विक्री झाल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी 22 आरोपींना अटक केली. पण सदर कंपनी सील करण्याचे अधिकार राज्याच्या कायद्याने राज्याला नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारला विनंती करुन अशा रासायनिक अमली पदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या सील करण्याचे अधिकार राज्य शासनाला मिळावेत असे प्रयत्न राज्याने करावे, अशी सूचना आमदार. अँड आशिष शेलार यांनी केली.

दरम्यान,पुढे बोलताना त्यांनी वांद्रे परिसरात अशा ड्रग्जचे अनेक अड्डे असून त्यावर कारवाई करा, अशी मागणी देखील केली. याबाबत लवकरच एक ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!