Share

अक्षयच्या ‘बेल बॉटम’च्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलणार?

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन लागु करण्यात आला होता. यादरम्यान पुन्हा एकदा अनेक बॉलिवुड चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरु लागल्याने टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. यादरम्यान अनेक रखडलेले चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे.

यादरम्यान बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’चे प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलले जाऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. काही दिवसापुर्वी अक्षयने हा चित्रपट २७ जुलै रोजी प्रदर्शीत होईल अशी घोषणा केली होती. यापुर्वी हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले.

मात्र २७ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल असे ठाम सांगितल्यानंतर अक्षयचे चाहते आनंदात होते. मात्र देशभरात कोरोनाची परिस्थीती बघता बेल बॉटमचे प्रदर्शन पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसापुर्वी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शीत होणार अशी चर्चा सुरु होती. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या १३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शीत होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!