Share

काँग्रेस आमदाराच्या निधनानंतर देगलूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी जागा लढवणार का?

Published On: 

मुंबई : काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.

देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे त्या जागेवर आम्ही त्याच पक्षाचा म्हणजेच काँग्रेसचाच उमेदवार देणार आहोत. या संदर्भात आम्ही मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. या जागेवर आम्ही ‘पंजा’ चिन्ह असलेला उमेदवार देणार असून दोन्ही पक्ष त्याला पाठिंबा देणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. मात्र देगलूरसाठी अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर–बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.  काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे आगामी काळात पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!