पंजाब: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दलित उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नाराज सिद्धुंचे मन वळविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर सोपवली गेली होती. आणि त्यांनी ती चोख बजावली आहे.
सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिद्धू यांचे मन वळविण्यात यश आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि सिद्धू यांनी सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान नवज्योतसिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतली. तर त्यातच दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह आणि एनएसए अजित डोभाल यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना अजूनच उधान आले. तर यावरूनच अकाली दलाने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाने राज्यात रबर स्टॅम्प सीएम केले आहे. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही सामना अग्रलेखातून कॉंग्रेसची अवस्था स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हैदराबाद संघावर मात करत सीएसकेने प्ले ऑफ मधले स्थान केले पक्के
- ‘सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती’
- काँग्रेस बुडवायची सुपारी त्यांच्याच लोकांनी घेतली-संजय राऊत
- महागाईचा फटका! कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात वाढ
- ‘भाजपालाही काँग्रेसचे टॉनिक लागते, पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

