नवी दिल्ली : सर्वसामान्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे, कारण कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसलेली असतानाच आता कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे येथील अन्न महाग होऊ शकते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमतीत बदल करण्यात आलेले नाही. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागील महिन्यात 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झालीहोती. याआधी 18 ऑगस्ट रोजी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉरपोरेशनने सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली होती. परिणामी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 859.5 रुपये झाले होती. परंतु घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
असे पहा दर-
एलपीजी सिलेंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. तुम्ही तुमच्या शहराच्या गॅस सिलिंडरची किंमत https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- MSEB कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावण्याच्या वक्त्याव्यावर तुपकर ठाम
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

