🕒 1 min read
अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे. दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाचे चालक दिलीप काकडे यांनी आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.
सरकार झालेल्या दुःखद घटनेची जबाबदारी घेणार का?
हे मविआ सरकारचं महापाप आहे!! @CMOMaharashtra pic.twitter.com/julKDCz25F— Prasad Lad (@PrasadLadInd) October 29, 2021
दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजप नेते आ. प्रसाद लाड यांनी याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील परिवहन महामंडळाचे चालक दिलीप काकडे यांनी आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली! त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. सरकार झालेल्या दुःखद घटनेची जबाबदारी घेणार का? हे मविआ सरकारचं महापाप आहे असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

