पुणे : महाराष्ट्र सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून आणि लॉकडाउनवरून राजकारण रंगल्याचं दिसतंय. केंद्र सरकारमुळे राज्यात कोरोना लसीची कमतरता असल्याचा आरोप केला जातो आहे. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे.
पुण्याला केंद्र सरकाकडून थेट दोन लाख 48 हजार डोस पाठवण्यात आल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेऊन केला होता. प्रत्यक्षात मात्र पुण्याला देखील राज्यातील इतर शहरांप्रमाणे राज्याच्या कोट्यातूनच लस मिळाल्याचं उघड झालं आहे. दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्याला शनिवारी फक्त एक लाख डोसचा पुरवठा झालाय त्यापैकी तीस हजार डोस पुणे शहराच्या वाट्याला आलेत. त्यामुळं श्रेय घेण्याच्या नादात पुण्याच्या महापौरांनी केलेले दावे फोल ठरल्याचं उघड झालं आहे. नंतर सारवासारव करताना महापौरांनी ‘येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं’ असं म्हणत वेळ मारुन नेली आहे.
पुणे जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांची देशातील विक्रमी संख्या नोंद होत असताना गेल्या दिवसांपासून इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत पुणे जिल्ह्यात दररोज 80 ते 85 हजार लोकांना लस दिली जात होती. मात्र लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने हे प्रमाण 50 ते 55 हजारांवर येऊन पोहचलं होतं. त्यामुळे पुण्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून थेट अडीच लाख लसीचे डोस मिळाल्याचा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी केला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची शिष्टाई कामाला आल्याचंही मोहोळ यांनी म्हटलं होतं.
पुण्याला नक्की किती लस मिळाली आणि ती केंद्राकडून थेट मिळाली की राज्याच्या कोट्यातुन मिळाली याबाब पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना पुण्याच्या महापौरांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बोट दाखवलंय. विभागीय आयुक्तांनी आपल्याला जी माहिती दिली तीच आपण पत्रकार परिषदेत सांगितल्याच महापौरांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुण्याला साडे तीन लाख नाही तर शनिवारी रात्री एक लाख डोसच मिळाल्याच मान्य केलय. येत्या तीन दिवसांमध्ये पुण्याला साडे तीन लाख डोस मिळणार असल्याचं आपल्याला म्हणायचं होतं असं महापौर म्हणालेत. त्याचबरोबर पुण्याला झालेला लसीचा पुरवठा हा थेट केंद्राकडून नाही तर राज्याच्या कोट्यातूनच झाल्याचं त्यांनी मान्य केलंय.
महत्वाच्या बातम्या
- स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने मनपा अधिकाऱ्यांना दिला ‘चकवा’!
- कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत – अजित पवार
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी कोर्टाकडून अर्णब गोस्वामीला दिलासा
- केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद मनपाची खरडपट्टी
- ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं’


