पुणे : महाराष्ट्र्र राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात रोज खटके उडत आहेत. मध्यंतरी महाराष्ट्र राज्यातील सुपरमार्केट मध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोंडसुख घेत होते. काल किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुण्यात जाऊन शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार कारण्यासाठी पुण्यात येताच पुणे शहरातील शिवसैनिकांनी चांगलाच राडा घातला. यामध्ये किरीट सोमय्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.
किरीट सोमय्या पुण्यात आल्यावर ते पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी पुणे महानगगरपालिका भवनात गेले असताना शहरातील हजारो शिवसैनिक आक्रमक झाले. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिका भवनात येणार हे कळताच शहरातील हजारो शिवसैनिक पुणे महानगरपालिका इमारतीच्या परिसरात जमले आणि आक्रमक झाले, आक्रमक शिवसैनिक किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावून गेले असता किरीट सोमय्या पुणे मनपा भवनाच्या पायऱ्यांवर पडले आणि त्यांना किरकोळ जखमही झाली आहे. पुणे महानगरपालिकेतील शिवसैनिकांचा हा राडा जवळपास ५-१० मिनिट सुरु होता.
संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आज पुण्यात आले असता पुण्यातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांची गाडी अडवली आणि राडा केला. काल पत्रकार परिषदेत आरोप करताना किरीट सोमय्या म्हणाले कि ‘संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले. शिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांचा देखील तेथेच मृत्यू झाला.
रायकर ज्या कोविड सेंटरमध्ये अॅडमिट होते, तो कोविड सेंटर संजय पाटकर यांचा होता. त्यांनी व्यवस्थित सर्विस न दिल्यामुळे रायकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार,’ असे सोमय्या म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- घोळ झाला… अन् राज्यपालांनी विचारलेल्या झाडाचे नाव एकाही मंत्र्याला सांगता आले नाही…
- अफगाणिस्तानचा मोहंमद शेहजाद अडकला मोठ्या वादात ; फोटो व्हायरल
- ठरलं तर…! ‘हा’ खेळाडू करणार रोहित शर्मा बरोबर सलामी
- मुंडे बंधूंच्या मतदार संघात प्रशासनाने केले दोन खून, तारामतीचा न्यायासाठी संघर्ष सुरूच
- आधी मृत्यूला झुंज दिल्यानंतर क्रिकेटर आता कॅन्सरमुळे व्हीलचेयरवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

