Share

वरळीतील ‘त्या’ पब आणि बारवर कारवाई करणार; चौफेर टीकेनंतर आदित्य ठाकरेंची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- राज्यात पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांवर प्रशासन धडक कारवाई करताना दिसून येत आहे मात्र सगळे सरकारी कायदे, नियम आणि शिक्षा या फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.वरळी भागातील पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला आहे.मनसे नेते संतोष धुरी यांनी एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात कसे नियम पायदळी तुडवले जात आहेत याची पोलखोल केली आहे.

आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,’ असं धुरी म्हणाले.

दरम्यान, धुरी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यावर आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका केली जात होती.याच व्हीडिओवरुन भाजपनं पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलंय. आधी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मग भाजप नेते निलेश राणे यांनी शेलक्या शब्दात आदित्य यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, आता आदित्य ठाकरे यांनी वरळीतल्या पबवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!