Share

संजय राठोड यांनी सोडलेल्या वनमंत्रीपदावर काँग्रेसचा डोळा ?

Published On: 

मुंबई : पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला.पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

अशा प्रकारे राजीनामा द्यावा लागलेले राठोड हे पहिलेच मंत्री आहेत.दरम्यान, सध्या संजय राठोड यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहे. दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना कॉंग्रेसचे मनसुबे काही वेगळेच असल्याचे दिसून येत आहेत. राठोड यांच्या राजीनाम्या नंतर आता काँग्रेसनंही वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे.

वनमंत्रीपद आपल्याकडे घेऊन मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला सोडण्याची तयारी काँग्रेसची आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचं कळतंय. खातेवाटपावेळी विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारमधील पहिली विकेट पडल्यानंतर काँग्रेसनं वनमंत्रीपदाची मागणी केल्याचं कळतंय.

दरम्यान, मंत्रीपदाची माल आपल्या गळ्यात पडून घेण्यासाठी शिवसेनेत देखील रस्सीखेच सुरु झाली आहे.शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर व आशिष जयस्वाल यांच्या नावाची आता वनमंत्रिपदासाठी सुरू झाली आहे.तीन टर्मपासून आमदार असलेले डॉ. रायमूलकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. २००९, २०१४ व २०१९ अशा तीन निवडणुकीत सलग चढत्या मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम रायमूलकर यांच्या नावावर आहे.

संजय रायमुलकर यांच्याशिवाय शिवसेनेचे माजीमंत्री रवींद्र वायकर आणि गोपी किशन बजोरिया यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. त्यापैकी रवींद्र वायकर हे उपनगरातील शिवसेनेचे खंदे समर्थक मानले जातात. गोपीकिशन बाजोरियादेखील शिवसेनेचा आक्रमक चेहरा मानला जातो. यामुळे या आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे येत्या काही दिवसात समोर येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!