Share

भाजपमधील काही आमदार राष्ट्रवादीत जाणार? मलिक-भुजबळ म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार फोडाफोडीवरून गेल्या काही दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कधी राष्ट्रवादी तर कधी कॉंग्रेस,कधी भाजप तर कधी सेना विरोधी पक्षातील आमदार आपल्या पक्षात येतील असा दावा करत आहेत.आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमधील आमदार आपल्या पक्षात येतील असा दावा करायला सुरुवात केली आहे.

भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दुसऱ्या बाजूला भाजपातील ७० टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत, शरद पवार याबद्दल निर्णय घेतील असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील मात्र कुणाला पक्षात घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपाचे १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हटल्यानंतर आता मलिक आणि छगन भुजबळ यांनी हे नवं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपाचे काही नेते, आमदार फुटणार का? या चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!