🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : कालच्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
या लाजीरवाण्या पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मावर फोडलं आहे. भारताच्या फलंदाजांनी अॅडलेड कसोटीत अक्षरशः लोटांगण घातले. कांगारूंच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांमध्येच गडगडला.
या दारूण पराभवाचं खापर नेटकऱ्यांनी अनुष्का आणि तिच्या होणाऱ्या बाळावर फोडायला सुरुवात केली. विराट कोहली याला ट्रोल करताना त्याच्या नेतृत्वातील टीमच्या पराभवाला अनुष्का जबाबदार असल्याचं म्हटलं. याआधी देखील विराटच्या खराब कामगिरीवर अनुष्कावर खापर फोडण्यात आलं होते त्या वेळी विराट आणि अनुष्काने त्याचा चांगलाच समाचार घेतला होता.
Good to see at least twitter has a sense of humour today!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 19, 2020
https://twitter.com/ElGujju/status/1340155135805116417?s=20
Anushka humne RCB ka lowest score ka record tod diya finally#AUSvINDtest pic.twitter.com/4vOibtOYK5
— Akhandbarbaadi (@akhandbarbaadi) December 19, 2020
https://twitter.com/JigarPeTrigger/status/1340227929498738689?s=20
महत्वाच्या बातम्या
- तकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश पाठोपाठ ‘या’ राज्यातील शाळा देखील होणार सुरु
- कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा राहुल गांधी यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
