🕒 1 min read
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय आणि सामाजिक विचारवंत तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी प्रवक्ते प्रा. मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे वृद्धापकालीन आजारामुळे निधन झाले. मागील दोन दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. काल दुपारी 3.30 वाजता वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम असा मोठा आप्तपरिवार आहे. वैद्य यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर आदरांजली अर्पण करत आहेत. मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
यासंदर्भात ट्वीटरवर जारी केलेल्या आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, मा. गो. वैद्य हे अत्यंत नामांकित लेखक आणि पत्रकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात त्यांनी कित्येक दशके महत्वपूर्ण योगदान दिले. भाजपाला अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती.असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ संपादक मा.गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे विचार, संस्कार आणि शिस्त यामुळे आपण घडलो याचा नेहमीच अभिमान राहिल अशा शब्दात नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी आदरांजली वाहिली आहे. .
संदीप जोशी म्हणाले,बाबुजींच्या सिध्दहस्त लेखनीने अनेक विषयांना न्याय दिला. देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतराचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून ख्याती असलेल्या श्री.मा.गो. वैद्य यांचे जाणे वेदनादायी आहे. बाबुजींच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनाच त्यांचा बौद्धिक ऊर्जेची अनुभूती यायची. शेवटपर्यंत विचार आणि विचारधारा सर्वदूर रूजविण्याचे कार्य त्यांनी केले. वयाच्या ९७व्या वर्षीही एक स्वयंसेवक म्हणून जबाबदारीने काम करणाऱ्या पितृतुल्य बाबुजींच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हिरावल्याचे दुःख आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- ‘रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रमाणे वागू नये’; नव्या संसद भवनावरून राऊतांची मोदींवर टीका
- करोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं – पुनावाला
- कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा राहुल गांधी यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
