Share

‘शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की नाही?’, आदित्य ठाकरेंनी दिले उत्तर; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. तसेच आता महाराष्ट्रातही दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी शाळा- कॉलेजच्या परिस्थितीवर पुन्हा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की,सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. परंतु पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.’ तसेच काही मुलांनी दोन वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सध्या गर्दी वाढली आहे. नाताळ, न्यू इयर असताना लोक काळजी जास्त घेत नाही. त्यामुळे मास्क लावणं गरजेचं आहे. लसीकरण झाल्यावरही मास्क घालावे लागणार आहे’, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!