🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होत आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. असे असतांनाच ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भुजबळ यांनी सांगितले की,’ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत आणि तशा पद्धतीने निवडणूक आयोगाला माहिती देण्यात यावी, असा एक ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला आहे.’ तसेच यासंदर्भातला सर्वपक्षीय ठराव आज(२७ डिसें.) सभागृहात घेण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ओबीसी आरक्षण संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली असून यात महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत जो निर्णय देण्यात आला आहे, त्याबद्दल आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. शिवाय केंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीही सामील होणार आहोत’, असेही भुजबळ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणा संदर्भात विधिमंडळात महत्वाचा ठराव मंजूर; छगन भुजबळांची माहिती
- ‘…त्यामुळे अशा देणग्या गोळा कराव्या लागतात राऊत साहेब’, राऊतांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
