🕒 1 min read
उस्मानाबाद : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. याला अनुसरून राज्यभरात २४ डिसें.ला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार(Dr. Bharti Pawar) यांनी याविषयी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना डॉ. भारती पवार म्हणाल्या की,’सध्या तरी केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक राज्याने पाळणे गरजेचे आहे. तसेच कुठे काय पेशन्ट्सची परिस्थिती असेल किंवा इन्फेक्शनच प्रमाण किती आहे. हे त्या-त्या राज्यांनी ठरवायचं आहे. एखाद्या राज्यात रुग्ण खूप वाढायला लागली तर राज्यसरकार लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकते. हे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले आहेत’, असे पवार यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी देखील ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले होते की,’ऑक्सिनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी ८०० मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मॅट्रीक टनाची आवश्यकता ५०० मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- ‘जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?’
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
