खामगाव :-मराठा आरक्षण जसे आजवर लागू आहे असेच कायम राहावे व मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश खारीज करण्यात यावा तसेच मराठा आरक्षण सरसकट व कायम लागू राहावे. यासाठी ठोस कारवाई करावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण समितीचे अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमुद आहे की, मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठ कडे वर्ग केले असताना मराठा समाज आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती व सन २0२0 – २१ या शैक्षणिक वर्षातील मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत व नोकर भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू न करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने मराठा समाजाच्या नव युवकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. हा निर्णय खरोखर सामाजिक अन्याय करणारा ठरणार आहे.
महाराष्ट्रातील विधिमंडळाने व उच्च न्यायालयाने एक मुखाने मराठा आरक्षण मंजूर केलेले आहे. या आरक्षणाकरिता आमच्या अनेक समाजबांधवांनी मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली आहे. हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तर या देशाच्या सन्मानासाठी अस्मितेसाठी रक्षणासाठी आमच्या समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. आमच्या समाजाने कधीही कोणत्याच समाजाला न दुखता समाजहित कायम जोपासले आहे.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने याची दखल न घेता निर्णय दिला असल्याचे आम्हाला वाटत आहे. या निर्णयाने आमच्या समाजातील भावी पिढीचे होणारे नुकसान लक्षात घेता मराठा आरक्षण जसे आजवर लागू आहे असेच कायम राहू द्यावे, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश खारीज करण्यात यावा, तसेच मराठा आरक्षण सरसकट व कायम लागू राहावे, यासाठी ठोस कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच योग्य न्याय न मिळाल्यास आम्ही निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे गणेश माने, किशोरआप्पा भोसले, संजय शिणगारे, रवी महाले, तेजेंद्रसिंह चौहान, रमाकांत गलांडे, संजय अवताडे, प्रवीण कदम, निलेश देशमुख, अजय शेळके, सूरज खोसे, किशोर लोखंडे, संतोष येवले यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- एकनाथ खडसेंकडे जी काही माहिती आहे त्यांनी ती जनतेसमोर आणावी : सचिन सावंत
- नागपूरकर म्हणतात’आय सपोर्ट तुकाराम मुंढे’
- सुशांतला न्याय मिळेपर्यंत आता भाजप गप्प बसणार नाही – देवेंद्र फडणवीस
- चिल्लर भुरटे आणि त्यांच्या सूत्रधारांसमोर झुकणार नाही : अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर घणाघात
- अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक तालुका सात दिवस लॉकडाऊन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

