Share

सुशांतला न्याय मिळेपर्यंत आता भाजप गप्प बसणार नाही – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाची भावना बिहार निवडणुकीत मांडणार असे बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पाटण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुशांतला न्याय मिळणार नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही असे सांगताना, बिहार भाजपच्या सुशांत पोस्टरची जबाबदारीही फडणवीस यांनी घेतली.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनच्या तपासाने वेग घेतला आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर रियाने बॉलिवूडचा खरा चेहरा समोर आणला आहे. रियाने दिलेल्या २५ बॉलिवूडकरांच्या यादीत एनसीबीच्या रडारवर सुरुवातीला ५ जण असल्याची माहिती मिळत आहे.

तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडावर आता बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड बड्या सेलेब्रिटींचा पार्टीतील व्हिडिओ समोर आला होता. ही पार्टी ३० जुलै २०१९ ला करण जोहरच्या घरी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हिडिओत शाहिद कपूर, विक्की कौशल, वरून धवण, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर दिसत आहेत. व्हिडिओतील त्यांच्या देहबोलीवरून त्यांनी ड्रग्ज घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एनसीबीकडून याची चौकशी होण्याची शक्यता.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!