Share

नागपूरकर म्हणतात ‘आय सपोर्ट तुकाराम मुंढे’

Published On: 

नागपूर : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हनंतर त्यांना समर्थनाचा ओघ वाढत आहे. अनेक नागपूरकरांनी ‘आय सपोर्ट तुकाराम मुंढे’ असे स्टेटस त्यांच्या व्हॉट्सअप, फेसबुकवर ठेवले आहे. सोबतच काही सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला आहे. सकाळी मुंढेंच्या समर्थनार्थ शहरात तिरंगा फडकला आणि आणि दिवसभर त्यांचीच चर्चा होती.

नागपुरातील करोना नियंत्रणात ठेवण्यात आयुक्त मुंढे यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांची बदली झाली आणि कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढला. गुरुवारी मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षातर्फे संयुक्त पत्रपरिषद घेऊन मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा देण्यात आला.

त्यानंतर शनिवारी मुंढे यांनी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर त्यांना पाठिंबा वाढत आहे. मुंढेंनी घेतलेल्या अनेक निर्णयाचे फेसबुकवर जाहीर समर्थन होत आहे. एवढे की, अनेक तरुणांनी आपापल्या स्टेटसमधून मुंढेंना समर्थन दर्शविले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या लोकप्रतिनिधींवर अनेकांमध्ये नाराजी दिसत आहे. तरुणांमध्ये मुंढेंची मोठी क्रेझ दिसत आहे.

शनिवारी मुंढे यांचे फेसबुक लाइव्ह सुरू असताना अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांना ट्रोल करणे सुरू केले होते. आवश्यक ती माहिती दिल्यानंतर मुंढे यांनी या ट्रोलरना उत्तर दिले. ‘तुम्ही काम करीत राहा, नागपूरकर तुमच्या पाठीशी आहेत’, असे म्हणत मुंढे यांना आपला पाठिंबा दर्शविला.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!