🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एका खाजगी वहिनीला मुलाखत देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखती दरम्यान खडसे म्हणाले की, काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ती समोर आली तर मोठी खळबळ उडेल पण मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करत नाही.
आता काँग्रेस नेेेतेे सचिन सावंत यांनी खडसेेंना आवाहन केले आहे की जनतेच्या हितासाठी त्या व्हिडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे बाहेर येऊ द्या. सचिन सावंत यांनी “एकनाथ खडसे तथा नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लिप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहा काय म्हणाले सचिन सावंत :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1013594335747730/
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
